प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या विषयात तज्ञ असतो, त्या प्रत्येकाचे ज्ञान/अनुभव ह्या संकेतस्थळाद्वारे मराठी मध्ये यावे आणि मराठी भाषेतील ज्ञान भंडार वाढावे त्याकरिता हा एक छोटासा प्रयत्न. तुम्ही येथे कुठ्ल्याही विषयावर लेखन करुन ते व्यासपीठ द्वारे प्रकाशीत करु शकतात.

अमिताभचा आवाज आणि रेडियो

रेडियोवर अमिताभचा आवाज निवडला गेला नाही ही आख्यायिका जुनी झाली. त्यामागे शास्त्रीय कारण आहे असे धरल्यास ते कोणते हे कळत नाही. कदाचित रेडियोवर ठराविक फ्रिक्वेन्सीच्या आतील रेडियो सिग्नल प्रक्षेपित करण्याची बंधने असल्यामुळे प्रथम आवाज "गाळून" बघत असतील. ही गाळणी म्हणजे माइकपासून पुढच्या भागातील सर्कीट केवळ ठराविक आवाजाची कंपने स्पीकरसाठी अधिक ताकदीची बनवीत असेल. अमिताभचा आवाज ह्या गाळणीत "अडकला". ह्या गाळणीची गरज का आहे ते समजून घेऊ. ह्यासाठी इलेकट्रॉनिक संदेश कसा बनतो ते पहा.

विकणारा विरुद्ध विकत घेणारा

मंदीच्या काळात, अमेरीकेतील नोकर्‍या टिकवून परदेशातील (भारत) कामगार जे कमी पगारात काम करत, त्यांना अमेरीकन सरकारने नाकारले. ह्याचे कारण केवळ नफ्याची भाषा म्हणजेच अर्थ(व्यवस्था) समजणार्‍यास कदाचित कळणार नाही. अर्थ किंवा किंमत, जी बाजारात खेळते एखाद्या विकल्याजाऊ शकणार्‍या (कमोडीटी) वस्तुसाठी; ती जितकी विकणार्‍यावर तितकीच विकत घेणार्‍यावर ठरते असे दिसते.

अमेरीकन नोकर्‍या ज्या जास्त पगार देण्यास तयार दिसतात, त्यांना अमेरीकन स्थानिक लोकांची काळजी आहे (जसे नवनिर्माण सेनेचे मागणे आहे!) की अमेरीकन ग्राहक हा नेहमीच परदेशी (भारतीय, भारतात पैसे पाठवणारा, खर्च भारतात)ग्राहकापेक्षा (कामगार नव्हे!) वरचढ ही भूमिका आहे?

अमेरीकन ग्राहक हा जगातील एक नंबरचा ग्राहक असल्यामुळेच त्याला जास्त पैसे खिशात देणे सोयिस्कर आहे असे वाटते.

मराठीतील आणि इन्ग्रजीतील सिनेमे

श्वास सारख्या सिनेमानन्तर हरिशचन्द्राची फॅक्टरी ऑस्करसाठी मानान्कीत झाला आहे ह्याचे कौतुक करावे तेवढे कमी. दादासाहेब फाळके आज जिवन्त असते तर मुम्बईमधे मराठी सिनेमा हा मद्रासमधील तामिळ सिनेमाप्रमाणे देशात स्वतःचे वेग्ळे स्थान करु शकला असता. मराठी सिनेमा केवळ हिन्दी सिनेमाची नक्कल न होता मराठी समजाचे चित्र मान्डणारा असावा. सध्या येणारे सिनेमे थोडेबहूत मराठी विषयाला वाचा फोडणारे आहेत असे दिसते. ह्यात अवधूत गुप्तेचा 'झेन्डा' आहे. मनसे आणि सेना या दोघात विभागण्यामुळे कार्यकर्त्याच्या मनातील द्वन्द्व ई. ह्यात दाखवण्यात आले आहे. सन्गीत दिग्दर्शन कथा अवधूत गुप्ते.

दुसरा इन्ग्रजी सिनेमा आहे अवतार, जेम्स कॅमेरून ह्याचा.

आरोग्य विमा निवडतांना घ्यायची काळजी

आरोग्य विमा हा आज आपल्या धकाधकीच्या जिवनात अपरीहार्य झाला आहे. आपल्याला किंवा घरातील एखाद्या सदस्याला जर अचानक दवाखान्याचा खर्च करावा लागला तर त्याची वेळेवर तजवीज करणे खुप अवघड जाते आणि जर एखादे ओपेरशन वैगेरे करावयाचे असेल तर मग खर्च हा लाखात जातो. अश्या वेळेस आरोग्य विमा असल्यास तुम्ही खर्चाची चिंता सोडुन त्या व्यक्तिच्या तब्येतीकडे लक्ष देवु शकतात. पण त्याकरीता तुमचा तसेच घरातील व्यक्तिंचा आरोग्य विमा उतरवलेला असणे खुप गरजेचे आहे तसेच तो योग्य प्रकारे पण उतरवलेला असावा.

हे तर सगळ्यांना माहीत आहे कि आरोग्य विमा हा तुम्हाला दवाखान्याच्या अचानक येण्यार्‍या खर्चाची तजवीज करुन देतो पण प्रश्न हा आहे की तो विमा कोणकोणत्या प्रकारचे तुमचे खर्च देईल, कोणत्या आजारासाठी आणि तसेच किती खर्च देईल तसेच कुठ्ल्या हॉस्पीटल्स आरोग्य विमा स्विकारतात हे सुद्दा बघणे आवश्यक आहे.

मनातले पानावर..नाही नाही..मनातले ब्लॉग वर..

मागच्या १० वर्षात मी १० ओळी सुद्धा माझ्या हाताने मराठीत लिहिल्या नसेल आणि त्याला कारण आहे हे इन्टरनेट, लैपटॉप आणि सेल फ़ोन वैगेरे. कारण ह्या आजच्या/रोजच्या जीवनात मला कागदावर लिहिण्याची काहीही गरज पडत नाही, कारण दिवसातील १० तास इन्टरनेट वर लैपटॉप समोर असतो त्याने होते काय की काहीही लिहायाचे असेल तर लगेच लैपटॉप वर लिहितो, म्हणुन हाताने लिहिण्याची सवय राहिली नाही.

शाळेत/कॉलेज मधे असताना खुप लिहिणे व्हायचे तसे आता राहिले नाही आणि त्यातून काही लिहिले (म्हणजे कधी काही एखादा फॉर्म भरायचा असेल वैगेरे) तर ते पण इंग्लिश मधे लिहिले जाते. मराठी लिहिण्याची सवय तर जवळ जवळ मोडित निघालेली आहे आणि अमेरिके मध्ये आल्यापासून तर मराठी चा सम्बन्ध फक्त फ़ोन वर आणि घरात बोलण्यापुरता मर्यादित झालेला आहे, लिहिण्याची तर गोष्टच सोडा…

ब्रॉडबैंड सॅटॅलाइट इंटरनेट चे फायदे/तोटे

जर तुम्ही अश्या भागात राहत आहात कि जेथे केबल इंटरनेट शक्य नाही किंवा ते अगदी कमी/तुटक प्रमाणात उपलब्ध आहे अश्या वेळेस आंतरजालावर जाण्यासाठी सॅटॅलाइट हायस्पीड इंटरनेट हा एक योग्य रस्ता आहे. सॅटॅलाइट इंटरनेट म्हणजे तुमचा कॉम्प्युटर जो डेटा आंतरजालावर पाठवतो आणि स्वीकार करतो तो एका सॅटॅलाइट द्वारे पाठवणे, ह्यालाच सॅटॅलाइट इंटरनेट म्हणतात.

तुमच्या कडे जर ब्रॉडबैंड केबल इंटरनेट असेल तर त्याचा डेटा हा केबल द्वारे पाठवला/स्वीकारला जातो पण सॅटॅलाइट इंटरनेट मध्ये त्याकरीता डिश आणि ट्रान्सरिसीवर चा वापर केला जातो त्यामुळे तुम्ही कुठेही असाल तरी तुम्हाला सॅटॅलाइट मुळे इंटरनेटची जोडणी मिळते व तुम्ही तुमचे काम विनासायास करू शकतात.

संगणक प्राथमिक सुरक्षा आणि अनुरक्षण

आजकाल बहुतेक लोक संगणक साक्षर झालेले आहेत. ईमेल, इन्टरनेट हे आता रोजच्या जिवनातील आवश्यक भाग बननेला आहे. आपल्याला संगणक कसा चालवायचा आणि इन्टरनेट कसे वापरायचे हे माहित असते पण बऱ्याच लोकांना संगणकाची सुरक्षा आणि त्याची दुरुस्ती कशी करावी आणि तो व्यवस्थित चालावा ह्या करीता काय काळजी घ्यावी हे माहित नसते.

मुक्त लेख निर्देशिका?

मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.

एक विनंती

लेखक, वाचक, सदस्यांना संकेतस्थळाबद्दल काही सुचना, अडचणी, प्रश्न असतील, लेखन वर्गवारी मध्ये नविन वर्ग टाकणे, लेख प्रकाशन/पुनर्प्रकाशना बाबत समस्या असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.

नविन सदस्य

  • समीर केसकर
  • राज पाटील
  • कांचन कराई
  • रवि
  • कल्पेश् बानोकर

Syndicate content