- लेखन वर्गवारी
- आरोग्य
- औद्योगिक
- आर्थिक
- शैक्षणिक
- धार्मिक
- राजकीय
- सामजिक
- व्यापार
- कायदा
- वाहन उद्योग
- जाहिरात
- धंदा/व्यवसाय
- टेक्नोलॉजी
- संगणक शास्त्र
- इन्टरनेट/सोशल नेट्वर्किंग
- दूरचित्रवाणी/रेडियो
- उत्सव/सण
- कुटुंब/परिवार
- कला/मनोरंजन
- गृह सजावट
- खाद्य पदार्थ/अन्नधान्य
- देश/विदेश
- प्रवास/भटकंती
- क्रीडा/खेळ
- व्यवसायीक कारकीर्द
- वैयक्तिक अनुभव
- सर्वसाधारण
संगणक प्राथमिक सुरक्षा आणि अनुरक्षण
ShareThis
आजकाल बहुतेक लोक संगणक साक्षर झालेले आहेत. ईमेल, इन्टरनेट हे आता रोजच्या जिवनातील आवश्यक भाग बननेला आहे. आपल्याला संगणक कसा चालवायचा आणि इन्टरनेट कसे वापरायचे हे माहित असते पण बऱ्याच लोकांना संगणकाची सुरक्षा आणि त्याची दुरुस्ती कशी करावी आणि तो व्यवस्थित चालावा ह्या करीता काय काळजी घ्यावी हे माहित नसते.
संगणक नीट चालावा, त्याचा स्पीड चांगला असावा आणि आपण जे काम संगणकावर करतो त्यात काही विघ्न येऊ नये असे वाटते त्याकरिता आपल्याला काही मूलभूत गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतील, जसे हार्ड ड्राइव चे रक्षण कसे करावे, तो ख़राब होण्यापासून वाचवून त्याचे आयुष्य कसे वाढेल, ओपेरटिंग सिस्टम चे अद्यतन कसे करावे. विषाक्त संक्रामक (वाइरस) विरोधी प्रणाली आणि त्याचे अद्यतन तसेच स्पायवेअर विरोधी प्रणाली कशी आणि केंव्हा वापरावी ह्या करीता खालील काही गोष्टी तुम्ही नियमित तुमच्या संगणकावर केल्या तर तुम्हाला तुमचा संगणक व्यवस्थित ठेवण्यास मदत होईल.
१. संगणक ऑपरेटिंग सिस्टम नेहेमी अद्यावत ठेवा. तुम्ही जर माइक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टम वापरत असाल तर http://updates.microsoft.com वर नियमित जाउन तुम्ही वापरत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टम चे काही नविन अद्यतन आहेत का? असेल तर ते तुमच्या संगणकावर उतरवून घ्या आणि इंस्टाल करा. हे तुम्ही दर आठवड्याला एक ठराविक दिवशी करू शकता नाहीतर विन्डोज़ मध्ये स्वचालित अद्यतन पण करता येते ते पण तुम्ही करू शकता.
२. विषाक्त संक्रामक विरोधी प्रणाली (Anti Virus) आजकाल प्रत्येक संगणक मध्ये आवश्यक आहे. त्याकरिता खुप प्रणाली बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यातील मी काही खाली देत आहे.
Symantec Norton Anti Virus
McAffe Anti Virus
AVG Anti Virus
विषाक्त संक्रामक विरोधी प्रणाली (Anti Virus) तुम्ही तुमच्या संगणकावर स्थापित केल्यावर तुम्हाला त्याचे नियमित अद्यतन करावे लागते तरच संगणक वाइरस पासून सुरक्षित होईल कारण रोज नविन नविन वाइरस येत निर्माण होत असतात त्या पासून संगणकाला संरक्षित करायचे असेल तर तुमची विषाक्त संक्रामक विरोधी प्रणाली (Anti Virus) अद्यतन ठेवावी लागेल. तसेच तुम्हाला त्या प्रणाली कडून नियमित तुमचा संगणक तपासून घ्यावा लागेल. हे तुम्ही १५ दिवसातून एकदा करू शकता त्यामुळे तुमच्या संगणक मध्ये कळत-नकळत वाइरस तर आलेला नाही ना ह्याची तुम्ही खात्री करून घेऊ शकतात.
३. आजकाल काही लिपी अश्या बनवल्या जातात कि तुम्ही एखादे संकेत स्थळ बघत आहात त्यावेळेस गुपचूप ती लिपी (script) तुमच्या संगणकावर इंस्टाल केली जाते आणि त्याद्वारे तुम्ही संगणकावर काय करता त्या मधील क्रेडीट कार्ड नंबर्स वैगेरे वैयक्तिक माहिती चोरून ती लिपी बनवणारा कडे पाठवली जाते ह्यालाच इंग्लिश मध्ये Spyware म्हणतात. आता हे असले प्रोग्राम संगणकावर येऊ नयेत आणि चुकून आले तर काय काळजी घ्यावी ह्या करिता खाली माहिती देत आहे.
स्पायवेअर आहेत कि नाही आणि ते रोखण्यासाठी एक चांगला प्रोग्राम आहे त्याचे नाव Search and Destroy Spybot. हा तुम्ही तुमच्या संगणकावर टाकून घेतला कि तो बाकीचे सगळे काम करतो. जर चुकून तुम्ही अश्या कुठल्या संकेतस्थळाला भेट दिली आणि त्यातून काही प्रोग्राम संगणकावर यायला लागला तर हा Search and Destroy Spybot तुम्हाला लगेच सांगतो त्यामुळे तुम्ही त्या प्रोग्राम ला लगेच प्रतिबंध करू शकता. तसेच तुम्हाला हि प्रणाली अद्यावत ठेवावी लागते कारण रोज नवीन नवीन प्रकारचे स्पायवेअर येतात आणि ते ओळखण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी तुम्हाला हि प्रणाली अद्यावत ठेवावी लागते.
४. तुमच्या संगणका मध्ये Hard Drive हा एक महत्वाचा घटक आहे जो तुम्ही काम केलेला सगळा डेटा जमा करून ठेवतो. तो नीट चालवा, चांगला चालवा तसेच त्याच्यात काही खराबी येऊ नये ह्या करिता तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल तसेच काही गोष्टी नियमित कराव्या लागतील जेणेकरून Hard Disk चे आयुष्य वाढेल आणि ती तुम्हाला जास्त वेळ पर्यंत चांगल्या प्रकारे सेवा पुरवू शकेल.
Hard Disk ची काळजी घेण्याकरिता तिचे नियमित Defragmentation करणे गरजेचे आहे. आता Defragmentation म्हणजे काय? तर ज्यावेळेस तुम्ही संगणकावर काम करत असतात आणि Hard Disk वर तुमचे काम तुम्ही जतन करत असतात त्यावेळेस त्या जतन करण्याची काही एक लय नसते तसेच संगणक काही तुमच्या फाईल एका पुढे एक अश्या रांगेत काही जतन करत नाही तो Hard Disk च्या मोकळ्या जागेत कुठेही फाईल जतन करतो त्यामुळे होते काय कि ज्या वेळेस त्या फाईल्स ची संख्या वाढते त्यावेळेस त्याला प्रत्येक फाईल बघायला आणि तपासायला वेळ लागतो त्यामुळे संगणकाच्या काम करण्याच्या गतीत फरक पडतो आणि संगणक तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला वेळ लावतो मग आपल्याला वाटते कि संगणकाची गती कमी झाली आहे. हि झाली De-fragmentation ची सोपी व्याख्या. तांत्रिक व्याख्या तुम्ही येथे बघू शकता http://en.wikipedia.org/wiki/Defragmentation तुम्ही जर नियमित De-fragmentation केले तर तुमचा संगणक तुम्हाला प्रतिक्रिया देण्याच्या वेळेत नक्कीच फरक जाणवेल आणि त्याची फाईल सिस्टम पण चांगली राहील.
५. आपण इंटरनेट वर रोज विविध प्रकारच्या संकेतस्थळाला भेट देत असतो त्यावेळेस तुमचा संगणकाचा ब्राउज़र काही तात्पुरत्या फाईल्स तुमच्या संगणकावर जमा करत असतो कारण तुम्हाला त्या संकेतस्थळावर काम करताना/भेट देताना गती चांगली मिळावी. ह्या अश्या फाईल्स संगणकावर खूप जमा होतात आणि त्या तुम्हाला वेळोवेळी काढून टाकाव्या लागतात. ह्या फाईल्स जर तुम्ही वेळोवेळी काढल्या तर संगणकावर तात्पुरत्या फाईल्स ची गर्दी कमी होईल आणि तुम्हाला संगणक काम करताना चांगली गती देईल. ह्या करिता काही पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही स्वतः त्या फाईल्स काढून टाकू शकता किंवा तुमच्या ब्राउज़र ला तसे स्वचालित करू शकतात. हे तुम्ही ब्राउज़रच्या Tools - Options मेनू मध्ये जाऊन स्वचालित करून शकता तसेच स्वचालित करण्याचे काही पर्याय पण तिथे उपलब्ध आहेत त्याला पण वापर करू शकतात.
ह्या अश्या काही मूलभूत गोष्टी तुम्ही जर नियमित पणे तुमच्या संगणकावर केल्या तर तुमचा संगणक तुम्हाला नक्कीच चांगली सेवा देईल आणि त्याचे आयुष्य पण वाढेल.
लेखक परिचय:
लेखक माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवणार्या कंपनीमध्ये 'संगणक सुरक्षा/संरक्षण' विभागात काम करतात..
- लेखन वर्गवारी :
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.

मुक्त लेख निर्देशिका?
मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.
एक विनंती
लेखक, वाचक, सदस्यांना संकेतस्थळाबद्दल काही सुचना, अडचणी, प्रश्न असतील, लेखन वर्गवारी मध्ये नविन वर्ग टाकणे, लेख प्रकाशन/पुनर्प्रकाशना बाबत समस्या असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.
नविन सदस्य
- श्री
- शन्कर उमाने
- प्रसाद
- सदानंद
- समीर केसकर

प्रतिक्रियां
माहीतीपुर्ण आणि मुद्देसुद
माहीतीपुर्ण आणि मुद्देसुद झाला आहे लेख. असेच लेख येऊ द्या.
दादासाहेब
माझा संगणक
माझ्या कॉम्पुटर वर सारखे खूप पोप-अप्स येत असतात त्या करिता काय करता येईल?
सख्या