- लेखन वर्गवारी
- आरोग्य
- औद्योगिक
- आर्थिक
- शैक्षणिक
- धार्मिक
- राजकीय
- सामजिक
- व्यापार
- कायदा
- वाहन उद्योग
- जाहिरात
- धंदा/व्यवसाय
- टेक्नोलॉजी
- संगणक शास्त्र
- इन्टरनेट/सोशल नेट्वर्किंग
- दूरचित्रवाणी/रेडियो
- उत्सव/सण
- कुटुंब/परिवार
- कला/मनोरंजन
- गृह सजावट
- खाद्य पदार्थ/अन्नधान्य
- देश/विदेश
- प्रवास/भटकंती
- क्रीडा/खेळ
- व्यवसायीक कारकीर्द
- वैयक्तिक अनुभव
- सर्वसाधारण
विकणारा विरुद्ध विकत घेणारा
ShareThis
मंदीच्या काळात, अमेरीकेतील नोकर्या टिकवून परदेशातील (भारत) कामगार जे कमी पगारात काम करत, त्यांना अमेरीकन सरकारने नाकारले. ह्याचे कारण केवळ नफ्याची भाषा म्हणजेच अर्थ(व्यवस्था) समजणार्यास कदाचित कळणार नाही. अर्थ किंवा किंमत, जी बाजारात खेळते एखाद्या विकल्याजाऊ शकणार्या (कमोडीटी) वस्तुसाठी; ती जितकी विकणार्यावर तितकीच विकत घेणार्यावर ठरते असे दिसते.
अमेरीकन नोकर्या ज्या जास्त पगार देण्यास तयार दिसतात, त्यांना अमेरीकन स्थानिक लोकांची काळजी आहे (जसे नवनिर्माण सेनेचे मागणे आहे!) की अमेरीकन ग्राहक हा नेहमीच परदेशी (भारतीय, भारतात पैसे पाठवणारा, खर्च भारतात)ग्राहकापेक्षा (कामगार नव्हे!) वरचढ ही भूमिका आहे?
अमेरीकन ग्राहक हा जगातील एक नंबरचा ग्राहक असल्यामुळेच त्याला जास्त पैसे खिशात देणे सोयिस्कर आहे असे वाटते.
भारतीय औद्योगिक समाज ह्या वास्तवाच्या जवळ गेलेला दिसत नाही. अजुनही ग्राहकाच्या खिशाची काळजी सरकारकडून घेतली जात नाही.
अनुमान काढता येईल का?, की देश आर्थिकदॄष्ट्या सक्षम म्हणजेच त्या देशातील सर्वात श्रीमंत उद्दोगांना जगातील सर्वात मोठी (ग्राहकशक्ती) बाजारपेठ (स्वतः तोच देश असेल तर फार उत्तम)बिनबोभाट "वापरता" येणे.
चीन देशाचा श्रीमंत उद्योग, उत्पादन (मॅन्यूफॅक्च्रर) हा असून त्या उद्योगाची (उत्पादीत वस्तू) बाजारपेठ जितकी चीनमधे आहे त्याहून जास्त भाग (बाजारपेठेचा) युरोप आणि अमेरीका (इ.) देश असल्यामुळे चीनला मंदीचा फटका बसू नये म्हणूनसुद्धा अमेरीकन समाजाच्या ग्राहकशक्तीला संरक्षण मिळाले आहे असे दिसते. चीनमधील उत्पादन उद्योग हा चीनी सरकारचा नसून युरोप आणि अमेरीकेतील उद्योगसमुहांचा आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योग ($ मिळवून देणारा) माहिती तंत्रज्ञान असल्याने देशाने देशांतर्गत माहिती-ग्राहकाची (इन्फर्मेशन कंझ्युमर) ताकद वाढवावी. सध्या इंटरनेट जोडणीकरीता मुंबई टेलिफोन निगमच्या विविध योजना लोकांपर्यंत जात असतात, त्यांचा शक्यतो भर स्वतःची (निगम) जोडणी मर्यादा वाढवण्याकडे असल्यास भारतीय माहिती ग्राहकाची जोपासना करता येईल.
इथे अमेरीकेचे धोरण लक्षात घेतल्यास त्यांचा समज, जगातील सुदॄढ बाजारपेठांमधील ग्राहक ताब्यात ठेवण्यात (गॅट)आणि देशांतर्गत ग्राहकाची आवड जोपासण्यात हित आहे, असे मानण्यात आहे. उत्पादन जरी दुसर्यादेशात (चीन/भारत) झाले तरीही त्या उत्पादनाचा मुख्य (अमेरीकन) ग्राहक आणि त्याचा खिसा ताब्यात ठेवून (अमेरीकन ग्राहक खर्च करण्यात अजूनही विश्वास ठेवतो हा मूर्खपणा) आपले आर्थिकहित साधता येईल या उद्देशाने (असे वाटते की) अमेरीकन नोकर्या टिकवून इतर देशातील कामगारांच्या नोकर्या (आऊट्सोर्सिंग)बंद झाल्या.
लेखक परिचय:
खास काही नाही.
- लेखन वर्गवारी :
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.

मुक्त लेख निर्देशिका?
मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.
एक विनंती
लेखक, वाचक, सदस्यांना संकेतस्थळाबद्दल काही सुचना, अडचणी, प्रश्न असतील, लेखन वर्गवारी मध्ये नविन वर्ग टाकणे, लेख प्रकाशन/पुनर्प्रकाशना बाबत समस्या असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.
नविन सदस्य
- श्री
- शन्कर उमाने
- प्रसाद
- सदानंद
- समीर केसकर

नविन प्रतिक्रिया
29 आठवडे 3 दिवस आधी
30 आठवडे 5 दिवस आधी
42 आठवडे 6 दिवस आधी
42 आठवडे 6 दिवस आधी