प्रश्नोत्तरे

मुक्त लेख निर्देशिका म्हणजे काय?
मुक्त लेख निर्देशिका म्हणजे ह्या संकेतस्थळावरील लेख/साहित्य हे पुनर्प्रकाशानाकरिता मुक्त आहे. वाचक/प्रकाशक ते कुठल्याही प्रकारे पुनर्प्रकाशित करू शकतात फक्त त्या करिता पुनर्प्रकाशानाच्या अटी पाळल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही ते तुमच्या संकेतस्थळावर/ब्लॉग वर वैगेरे पुनर्प्रकाशित करू शकतात. साहित्य हे पुनर्प्रकाशन मुक्त करून त्याचा मराठी मध्ये ज्ञान प्रसार व्हावा हाच एक उद्देश आहे.

ह्या संकेतस्थळावर कुठल्या प्रकारचे साहित्य स्वीकारले जाते?
इथे लेखन वर्गवारी केलेली आहे त्या वर्गवारी प्रमाणे तुम्ही तुमचे साहित्य कुठल्याही वर्गात टाकू शकतात पण त्या करीता तुमचे साहित्य त्या वर्गावारीशी संबंधित असायला हवे. प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या विषयात तज्ञ असतो, त्या प्रत्येकाचे ज्ञान/अनुभव ह्या संकेतस्थळाद्वारे मराठी मध्ये यावे आणि मराठी भाषेतील ज्ञान भंडार वाढावे त्याकरिता हा एक छोटासा प्रयत्न. आपण आपल्या रोजच्या जिवनातील चांगल्या गोष्टी दुसर्‍याला माहित करून देवू शकतो, तुम्ही एखाद्या विषयातील तज्ञ असाल तर तो विषय चांगल्या प्रकारे कसा हाताळायाचा, त्याचा रोजच्या जीवनात चांगला वापर कसा करायचा हे तुम्हाला चांगले माहीत असते पण तेच दुसर्‍या व्यक्तीला माहित असेल असे नाही.

म्हणजे मी नक्की काय करावे/काय लिहावे?
जसे की तुम्ही संगणक तज्ञ आहात तर तुम्ही संगणकाशी संबंधित लेख लिहू शकतात की त्याची काळजी कशी घ्यावी, त्याचा योग्य वापर कसा करावा, त्या क्षेत्रात होणारे बदल वैगेरे. तुम्ही आर्थिक क्षेत्रात काम करत असाल तर त्या क्षेत्रातील घडामोडी, शेयर बाजार वैगेरे बाबतीत लिहू शकतात. तुम्ही सौंदर्य तज्ञ असाल तर सौंदर्याची काळजी/त्वचेची कशी घ्यायची ह्या बाबतीत लिहू शकतात. तुम्ही ज्योतीषी असाल तर ज्योतीष शास्त्रावर लिहु शकतात. भाषा तज्ञ असाल तर एखाद्या भाषेसंदर्भात लिहु शकतात.

अशी संकेतस्थळे बरीच आहे मग परत हे संकेतस्थळ कशा करीता?
अशी संकेतस्थळे इंग्रजी व दुसर्‍या भाषेत बरीच आहेत तसेच मराठी भाषेत असावे त्या करीता हा एक प्रयत्न. एक मराठी प्रेमिचा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.

मला अजुन प्रश्न आहेत त्याची उत्तरे मिळतिल का?
जरुर. इथल्या संप्रर्क पानावर जाउन तुम्ही अजुन प्रश्न असतील तर बेधड़क विचारू शकतात.

मुक्त लेख निर्देशिका?

मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.

एक विनंती

लेखक, वाचक, सदस्यांना संकेतस्थळाबद्दल काही सुचना, अडचणी, प्रश्न असतील, लेखन वर्गवारी मध्ये नविन वर्ग टाकणे, लेख प्रकाशन/पुनर्प्रकाशना बाबत समस्या असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.

नविन सदस्य

  • श्री
  • शन्कर उमाने
  • प्रसाद
  • सदानंद
  • समीर केसकर