अमिताभचा आवाज आणि रेडियो

ShareThis

रेडियोवर अमिताभचा आवाज निवडला गेला नाही ही आख्यायिका जुनी झाली. त्यामागे शास्त्रीय कारण आहे असे धरल्यास ते कोणते हे कळत नाही. कदाचित रेडियोवर ठराविक फ्रिक्वेन्सीच्या आतील रेडियो सिग्नल प्रक्षेपित करण्याची बंधने असल्यामुळे प्रथम आवाज "गाळून" बघत असतील. ही गाळणी म्हणजे माइकपासून पुढच्या भागातील सर्कीट केवळ ठराविक आवाजाची कंपने स्पीकरसाठी अधिक ताकदीची बनवीत असेल. अमिताभचा आवाज ह्या गाळणीत "अडकला". ह्या गाळणीची गरज का आहे ते समजून घेऊ. ह्यासाठी इलेकट्रॉनिक संदेश कसा बनतो ते पहा.

फुरियर नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञाने हे प्रमेय मांडले की कोणताही संदेश हा इतर संदेशांपासून बनल्याचे दाखवता येते जर ते इतर संदेश अजून इतर संदेशांपासून बनलेले नसतील(ऑर्थोगोनल). जसे की मराठीतील संदेश हा वर्णमालेतील अक्षरांपासुन तयार झालेला असून ही अक्षरे मात्र इतर कोणत्याही "अक्षरांपासून" बनलेली नाहीत. अशाप्रकारे मूळ वर्णमाला असल्यामुळे इतर कोणतेही संदेश बनवता येतात. इलेक्ट्रॉनिक संदेशामधील अशी वर्णमाला म्हणजे फुरियर वर्णमाला किंवा फुरियर स्पेक्ट्रम. ह्यात असलेली कंपने(फ्रिक्वेन्सी) एकत्र केल्यास मूळ संदेश बनवता येतो. वर सांगितलेली "गाळणी" ही ह्या स्पेक्ट्रममधील विविध कंपनांना कमी अधिक ताकद देऊन मूळ संदेशाला प्रक्षेपणायोग्य बनविते. तरीही गाळणीची गरज काय? तर कोणताही इलेक्ट्रॉनिक संदेश हा अगणित कंपनांनी बनलेला असतो असे फुरियर म्हणतात. अगणित कंपने कशी प्रसारीत करणार? जर संदेश आवर्तने घेणारा असेल (जसे कि दिवस रात्र, घड्याळाची टिक टिक इ) तरच फुरियर स्पेक्ट्रम हा ठराविक(अगणित नव्हे तर मोजक्या) कंपनांनी बनलेला असतो. रेडियोवरील अथवा फोनवरील संदेश हा आवर्तने घेणारा संदेश नसून अनावर्तित असतो. त्यामुळे अगणित कंपनांमधून (निवडक)कंपने प्रक्षेपणासाठी निवडली जातात जी वापरून ए॓कणार्‍याकडील इलेक्ट्रॉनिक सर्कीट "उमगेल असा" आवाज स्पिकरमधून ए॓कवू शकते. म्हणून ह्या गाळणीची गरज आहे. तसेच ए-एम रेडियोचा संदेश वातावरणातील संदेश प्रदूषणामुळे(इएमआय) खराब होतो. तो परत मिळवताना जे तंत्र वापारावे लागते (डिमॉडूलेशन)त्यात आवाज गाळणीच्या "कडांना" (०-१६ किलो हर्ट्झ)जास्त खराब होतो. बेसमधील आवाज "त्याकाळातील" उपलब्ध प्रक्षेपणाच्या योग्य नसल्याचे हे कारण असू शकते. मग तोच आवाज चित्रपटासाठी कसा चालला? रेडियोवरील आवाज "लाइव" असतो. प्रक्षेपण जास्तीत जास्त "लाइव" असावे ह्यासाठी प्रक्षेपणाची कमाल कंपन मर्यादा खाली असावी असे तन्त्र वापरतात. संदेश विविध तन्त्राने 'कमी कंपनांचा' करतात(जसे स्टेनोग्राफर करते). गाळणीची उपयुक्तता इथे प्रकर्षाने समोर येते. चित्रपटातील आवाज हा "जसाच्या तसा"(रॉ, सर्व कंपने) रेकोर्ड केलेला असू शकतो. शिवाय इथे कोणतीही प्रसारणाची बंधने नसतात(हवेतील प्रसारणच नसते). डॉल्बी तंत्रात आवाज (कमीत कमी गाळला जाऊन) सुस्पष्ट यावा यासाठी त्याचे विविध "कोडेक" वापरून संस्करण केले जाते. त्यामुळे निवडक कंपनाच्या ए॓वजी संपूर्ण (रॉ) पण डिजिटल (जसा इंटरनेटवर संदेश जातो) संदेश आवाजासाठी वापरतात. ह्या सर्व कारणांमुळे असे वाटते की अमिताभचा बेसमधील प्रसिद्ध आवाज आकाशवाणीने प्रसारणायोग्य नसल्याचे कारण दाखवून "गाळला" असावा.
http://en.wikipedia.org/wiki/A.M._Radio#Frequency_bands

लेखक परिचय: 
खास नाही.
4.5

प्रतिक्रियां

फारच सुंदर

फारच सुंदर माहीती आहे. अमिताभचा आवाज नाकारण्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण असावं, असं वाटत होतं पण ते माहित नव्हतं. शिवाय रेडिओ आणि चित्रपटासाठी दिल्या जाणा-या आवाजातील फरकही कळला.

रेडिओ

रेडिओ आणि चित्रपटामधील आवाज ह्याचा फरक फार सुंदर समजवला आहे. असेच ज्ञानात भर टाकणारे लेख येऊ द्या.

दादासाहेब

मुक्त लेख निर्देशिका?

मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.

एक विनंती

लेखक, वाचक, सदस्यांना संकेतस्थळाबद्दल काही सुचना, अडचणी, प्रश्न असतील, लेखन वर्गवारी मध्ये नविन वर्ग टाकणे, लेख प्रकाशन/पुनर्प्रकाशना बाबत समस्या असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.

नविन सदस्य

  • सदानंद
  • समीर केसकर
  • राज पाटील
  • कांचन कराई
  • रवि